Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट” अ” (अराजपत्रित) ते गट” ड” मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट” अ” (अराजपत्रित) ते गट” ड” मधील खालील तक्त्यामध्ये नमूद 26 विविध संवर्गातील पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत. सदर जाहीरातीद्वारे कळविण्यात येते की, गट ‘अ’ से गट ‘ड’ मधील एकूण 26 संवर्गाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि.10/11/2023 रोजी सायंकाळी 5:00 पासून ते दि. 30/ 11 / 2023 रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. 30/11/2023 या दिवशी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाचे पदाचे पदनाम, वेतनश्रेणी, पदसंख्या याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अ. क्र. | पदनाम | वेतन |
1 | पर्यावरण संवर्धन अधिकारी | 56,100 रूपये |
2 | मुख्य अग्निशमन अधिकारी अधीक्षक फायर मार्शल | 56,100 रूपये |
3 | पशुवैद्यकीय सर्जन / प्राणी वैद्यकीय अधिकारी | 56,100 रूपये |
4 | उद्यान अधीक्षक | 41,800 रूपये |
5 | क्रीडाधिकारी | 41,800 रूपये |
6 | जीवशास्त्रज्ञ | 41,800 रूपये |
7 | महिला व बालविकास अधिकारी | 41,800 रूपये |
8 | सामाजिक विकास अधिकारी | 41,800 रूपये |
9 | कनिष्ठ अभियंता (आकिटेक्चर) | 38,600 रूपये |
10 | कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाइल) | 38,600 रूपये |
11 | कनिष्ट अभियंता (विदयुत) | 38,600 रूपये |
12 | सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी | 29,200 रूपये |
13 | सहाय्यक उद्यान अधिक्षक | 29,200 रूपये |
14 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅक्टेक्निशियन) | 29,200 रूपये |
15 | आरोग्य निरीक्षक | 29,200 रूपये |
16 | स्टेनो टायपिस्ट | 25,500 रूपये |
17 | मिडवाइफ | 25,500 रूपये |
18 | नेटवर्क इंजिनिअर | 25,500 रूपये |
19 | अनुरेखक (ट्रेसर) | 21,700 रूपये |
20 | सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 19,900 रूपये |
21 | फायर मोटार मेकॅनिक | 19,900 रूपये |
22 | कनिष्ठ श्रेणी लिपीक | 19,900 रूपये |
23 | पाईप फिटर व फिल्टर फिटर | 19,900 रूपये |
24 | पंप ऑपरेटर | 19,900 रूपये |
25 | सुरक्षारक्षक | 18,000 रूपये |
26 | फायरमन | 15,000 रूपये |
परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केला जाईल, संभाव्य बदलाबाबतच्या सूचना सोलापूर महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेत स्थळावर प्रसारित केल्या जातील, यांचीउमेदवारांनी नोंद घ्यावी.
उमेदवारांना महत्वाच्या सूचना :
- संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिरात/ अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुनच अर्ज सादर करावा अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता ग्राह्य धरली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
- अर्ज सादर केलेल्या उमेदवारांस प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी आवश्यक ती शैक्षणक व इतर अहंता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारांस निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाहीं, त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज करावा.
- महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला/ गॅझेट सादर करणे आवश्यक आहे.
- पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा, व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयंअध्ययन मार्गदर्शन केंद्र/वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा / संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये.
- अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर केलेल्या कागदपत्रांतील माहिती व मूळ अर्जातील माहिती यामध्ये तफावत आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल, तसेच उमेदवार यांनी अनांमधील माहिती संदर्भातील कागदोपत्री प्रावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची निवड रह करण्यात येईल.
- वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्ग / क्रिमीलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, अनाय, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, खेळाडूबाबतचा अनुभव व अर्ज करावयाचा प्रवर्ग तसेच ज्या दिव्यांगांना मदतनीस आवश्यक आहे त्याबाबतचा तपशील या बाबी न चुकता अर्जामध्ये स्पष्टपणे व अचूक भरणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास, संबंधीत दाव्याचा विचार केला जाणार नाही, उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
- ज्या उमेदवारांना बापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय / समाज कल्याण / आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी/जिल्हा सैनिक बोर्ड/अपंग कल्याण कार्यालय इ. कार्यालयात नोंदविलेले आहे अशा उमेदवारांनी देखिल स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक :
अ. क्र | तपशील | दिनांक |
1 | ऑनलाईन पध्दती अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | दि. 10/11/2023 पासून |
2 | ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | दि. 30/11/2023 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत |
3 | केंद्र प्रवेशपत्र (हॉल तिकीट) मिळण्याचे दिनांक | परीक्षा दिनांकाच्या सात दिवस आगोदर. |
4 | परीक्षेचा दिनांक | सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. |
निवड पद्धत :
- परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस. एम. एस. (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच सोलापूर महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल, त्यामुळे अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी वेळोवेळी संकेत स्थळास भेट देणे आवश्यक राहील. ई-मेल किंवा एस. एम. एस. (SMS) मिळाला नाही ही सबब मान्य केली जाणार नाही.
- पदास आवश्यक असलेली अहंता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
- वरील सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. मात्र निवडसूचीतील उमेदवाराची व त्या उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी (KYC Verification) उमेदवारांना प्रत्यक्ष बोलविले जाईल.
- उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ५० % व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- पात्र ठरणा-या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणोकरीता पाचारण करण्यात येईल, त्याबाबतची यादी व वेळापत्रक सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ई-मेल अथवा मोबाईलवर मेसेजद्वारे कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
इतर सर्वसाधारण अटी / शर्ती / सूचना :
- उमेदवार हा भारताचा नागरीक असावा. आणि महाराष्ट्रात १५ वर्ष अधिवास (Domicile) करीत असल्याबाबतचे त्याने सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र (तहसिलदार यांचे कार्यालयाकडील) किंवा महाराष्ट्रात जन्म झाल्याबाबत जन्म दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तसाच अर्थ असेल.
- शैक्षणिक अर्हते व्यतिरीक्त गट ‘अ, ब आणि क मधील सर्व पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांना नेमणूकीसाठी दि.०४ फेब्रुवारी, २०१३ व समान क्रमांकाचे शासन पुरकपत्र दि.०८ जानेवारी, २०१८ मधील तदतुदीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत संगणक व माहिती तंत्रज्ञान व संबंधित विषय घेवून उत्तीर्ण अथवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (AICTE) मार्फत पदवी किंवा पदवीका अथवा इंडियन सिर्टिफिकेट ऑफ स्कूल एज्युकेशन (ICSC) यांच्या मार्फत दहावी व बारावी परिक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान विषय घेवून उत्तीर्ण व त्याबाबतचे प्रमाणपत्र अथवा दि. 16 जुलै 2018 चे शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद (MSCE) पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या गर्व्हनमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स (GCC-TBC) अंतर्गत बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टार्यापंग मराठी/इंग्रजी/हिंदी- 30 अथवा 40 श.प्र.मि सादर करणे आवश्यक राहील.
- टंकलेखन प्रमाणपत्राची आवश्यकता असलेल्या पर्दाकरीता, उमेदवारांनी मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट अथवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे, इतर कोणतेही प्रमाणपत्र अनुज्ञेय असणार नाही.
- महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी पारित केलेल्या शासन निर्णयान्वये दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक यांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीत व दोन संधीत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवधी व संधी देण्यात आलेली आहे. तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार सध्या लिपिक टंकलेखक या पदास टंकलेखनाचे (इंग्रजी/मराठी) प्रमाणपत्र Upload करण्यापासून सूट देण्यात येत आहे.
- महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी पारित केलेल्या शासन निर्णयान्वये भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त/अंशकालीन पदवीधर उमेदवार जर लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाली तर टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्ष इतका अवधी देण्यात येत आहे. तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार सध्या लिपिक टंकलेखक या पदास टंकलेखनाचे (इंग्रजी/मराठी) प्रमाणपत्र Upload करण्यापासून सूट देण्यात येत आहे.
- महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे दि. 12 जानेवारी 2023 अन्वये लिपिक टंकलेखक या पदाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे केवळ मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट वेगमयदिचे प्रमाणपत्र असल्यास त्याने सदर प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहिल. इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन वेगमर्यादेचे विहित प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांकापासून 04 वर्षात प्राप्त करावायाचे असल्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सदर प्रमाणपत्र Upload करणेपासून सूट देण्यात येत आहे.
विशेष सूचना :
- सोलापूर महानगरपालिकेस सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे / अभिलेखे हे महानगरपालिकेच्या अभिलेखाचा भाग होतील व शासकीय नियमानुसार वापरण्यात येतील,
- जर एखाद्या उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमाचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तीची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
- मध्यस्थ / ठग / सोलापूर महानगरपालिकेत संबंध असल्याचे भासविणाऱ्या व्यक्ती, यांच्या गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनापासून सावध राहण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात येत आहेत.
- प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत उमेदवारांस काही हरकत असल्यास प्रति प्रश्न रु.१००/- इतके शुल्क आकारले जाईल.
- वेगवेगळ्या सत्रांमध्ये पार पडणाज्या परिक्षेमधील प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असतील, अशा वेळी परीक्षार्थीची संख्या विचारात घेऊन परीक्षा एकापेक्षा अनेक सत्रांत पार पाडावयाची झाल्यास भिन्न प्रश्नपत्रिकांच्या काठिण्य पातळीचे समानीकरण (Normalization) करण्यात येईल व त्यासाठी Mean Standard Deviation Method या सूत्र पद्धतीचा अवलंब करण्यात येईल.
- परीक्षे संबंधी / प्रतिक्षा यादी / कागदपत्रे तपासणी बाबत / नियुक्ती आदेश याबाबतची माहिती केवळ SMS/Email द्वारे कळविण्यात येईल, कोणताही पन्त्र व्यवहार पोष्टा मार्फत / पत्त्यावर केला जाणार नाही.