राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक भरती 2023 | NHM Nashik Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक परिमंडळांतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक स्तरावरील रिक्त असलेले खालीलप्रमाणे कंत्राटी पदे नियुक्त करण्यासाठीची भरतीप्रक्रिया करणेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कंत्राटी व करार पदध्तीने मानधन तत्वावर पात्र उमेदवाराकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अ. क्र.मुद्दा माहिती
1पदाचे नावशिक्षक
2शैक्षणिक पात्रता BSC NURSING
3मासिक वेतन25,000 रूपये
4नोकरी ठिकाणस्किल लॅब, नाशिक
5एकूण पदे 01

अटी व शर्ती :

  1. उपरोक्त तक्त्यात नमूद केलेले रिक्त पद हे भज क प्रवर्गासाठी असून, भज ड, विजा अ, भज ब व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडूनही अर्ज मागविण्यात येत आहे. तथापि विजाभज संवर्गातील अंतर्गत परिवर्तनाबाबतच्या शासन निर्णय बीसीसी नुसार भज क चा उमेदवार उपलब्ध न झाल्यास भज ड, विजा अब भज व प्रवर्गातील उमेदवाराला अनुक्रमे नियुक्ती देण्यात येईल, तसेच विजा अ, भज ब, भज क व भज ड या प्रवर्गातील उमेदवार न मिळाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल. तद्नंतर खुल्या प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात दिलेली सदरची नियुक्ती भविष्यातील भरतीप्रक्रीयेमध्ये विजा अ, भज ब, भज क व भज इ प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाल्यास संपुष्टात येण्याच्या अटीवर देण्यात येईल. तसेच भविष्यातील भरतीप्रक्रियमध्ये विजा अ, भज ब, भज क व भज ड प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास संबंधित खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला पुनश्चः पुनर्नियुक्ती देण्यात येईल. सदरची प्रक्रिया त्या त्या वेळीच्या सामाजिक आरक्षणानुसार तयार केलेल्या बिंदुनामावलीनुसार विशिष्ट प्रवर्गातील उमेदवार जो पर्यंत उपलब्ध होणार नाही तो पर्यंत करण्यात येत राहील याची नोंद घ्यावी.
  2. पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.
  3. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक २५ एप्रिल २०१६ चे शासन निर्णयास अनुसरून अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय करीता ४३ वर्षे राहील. वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.), विशेषतज्ञ, अतिविशेषज्ञ यांची कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहील. अभियानातील इतर रुग्ण सेवेशी संबंधित पदांसाठी ( उदा. परिचारीका, अधिपरिचारीका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता, इत्यादी) यांची कमाल वयोमर्यादा ६५ वर्ष राहील.
  4. वयाच्या ६० किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या उमेदवारांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडुन शारीरीक दृष्टया सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
अर्ज (Application)येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

विशेष माहिती :

  • वरील सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असुन, त्यांचा कालावधी अकरा महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. अथवा त्या आधी मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील.
  • खुल्या प्रवर्गासाठी रु.१५० व राखीव प्रवर्गासाठी रु.१०० इतके अर्ज शुल्क डिमांड ड्राफट च्या स्वरुपात “DDHS NASHIK” यांचे नावे काढून अर्जासोबत जमा करण्यात यावे.
  • वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत.
  • केंद्र / राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
  • अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  • उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा. जर मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधुन सादर केलेला असेल, परंतु सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
  • राखीव संवर्गातुन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्या संवर्गाचे जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. अशा उमेदवारांना राखीव संवर्गाचा लाभही घेता येणार नाही.
  • सहसंचालक ( अतांत्रिक) रा.आ.अ. मुंबई यांचे क्र. राआसो / मनुष्यबळ / आरक्षण /२४५६४-७७४/१६ दि. २०.०७.२०१६ रोजीच्या पत्रानुसार आवश्यक असणाऱ्या आरक्षित संवर्गातील उमेदवार उपलब्ध न आल्यास पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इतर संवर्गातील उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
  • वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ इत्यादी पदाकरीता तत्सम कौन्सिलकडील वैध नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील अन्यथा उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
  • कौन्सिलकडील नोंदणीबाबत अथवा इतर कोणत्याही कागदपत्रांची असलेली वैधता ही चालू कालावधीतील असावी. तथापी वैदय प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
अर्ज सादर करण्याकरीता पत्ता : उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, नाशिक ४२२००१

अतिशय महत्वाचे :

  1. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा.
  2. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी. १६) भरती प्रक्रिये दरम्यान मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही.
  3. अर्जाचा नमुना हा जाहिरातीसोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
  4. उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने तसेच आवश्यकतेनुसार कागदपत्रे जोडले नसल्यास नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही.
  5. विहीत नमुन्यातील अर्जासोबत १) वयाचा पुरावा, २) पदवी/पदविका शेवटच्या वर्षाची प्रमाणपत्र (टिपः सर्व वर्षांचे प्रमाणपत्र सादर करु नये) ३) गुणपत्रिका ४) कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable) ५) शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रांच्या छायांक्ति प्रती साक्षांकित करुन जोडण्यात याव्यात व तसेच पडताळणीसाठी मुळ कागदपत्रे सोबत ठेवावीत.
  6. सदर पदाची भरतीप्रक्रिया ही वरिष्ठ कार्यालयाकडुन प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार गुणांकन पध्दतीने होणार असुन, याकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
  7. निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्याबाबत रु.१००/- बॉन्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल.
  8. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांमध्ये नियुक्तीचे ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल.
  9. भरती प्रक्रियेच संपुर्ण अधिकारी, पदे कमी-जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे निवड प्रकियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार, इत्यादी प्रकारचे सर्व अधिकार हे मा. उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक परिमंडळ, नाशिक यांनी राखुन ठेवलेले आहेत.
  10. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक अंतर्गत TUTOR या पदांसाठी दि. २२/११/२०२३ ते दि. ०१/१२/२०२३ या कालावधीमध्ये सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत खालील नमुद पत्त्यावर उपरोक्तप्रमाणे नमुद केल्याप्रमाणे विहीत नमुन्यात प्रत्यक्ष अथवा पोस्टद्वारे अर्ज सादर करावा. ऑनलाईन अथवा ई-मेल द्वारे प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

Leave a Comment