Darubandi Police Bharti 2025 | दारूबंदी पोलीस भरती 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान (दारुबंदी पोलीस), जवान-नि-वाहनचालक (दारुबंदी पोलीस) व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
या पदांची भरती :
लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान (दारुबंदी पोलीस), जवान-नि-वाहनचालक (दारुबंदी पोलीस) व चपराशी ही पदे भरली जाणार आहेत.
मासिक वेतन : Darubandi Police Bharti 2025
निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.
पदाचे नाव | मासिक वेतन |
लघुलेखक (निम्नश्रेणी) | ४१,८०० ते १,३२,३०० |
लघुटंकलेखक | २५,५०० ते ८१,१०० |
जवान (दारुबंदी पोलीस) | २१,७०० ते ६९,१०० |
जवान-नि-वाहनचालक (दारुबंदी पोलीस) | २१,७०० ते ६९,१०० |
चपराशी | १५,००० ते ४७,६०० |
शैक्षणिक अहर्ता :
1] लघुलेखक (निम्न श्रेणी) : १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, २ ) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट, ३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक.
2] लघुटकलेखक : १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, २) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट, ३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक.
3] जवान (दारुबंदी पोलीस) : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीण
4] जवान-नि-वाहनचालक (दारुबंदी पोलीस) : १) इयत्ता ७ वी उत्तीर्ण २) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
5) चपराशी : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (10वी उत्तीर्ण)
इतर आवश्यक माहिती :
1] शारिरीक पात्रता :-
जवान, राज्य उत्पादन शुल्क व जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनो खालील शारिरीक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी 1] उंची : किमान १६५ से.मा. (अनवाणी) 2] छाती : न फुगविता ७९ से.मी. (किमान) व फुगवून छातीतोल किमान प्रसरण ५ से.मो. आवश्यक. 3] वजन : लागू नाही. महिला उमेदवारांसाठी 1] किमान १६० से.मी. (अनवाणी) 2] छाती : लागू नाही 3] वजन : ५० कि.ग्रॅ.
2] संबंधित संवर्गातील नियुक्तीकरीता शिफारस पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी विभागामार्फत सक्षम प्राधिकान्याकडून तपासून घेण्यात येतील, विहीत शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.
3] प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहीत केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
4] जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क पदाकरिता हलके / जड चारचाकी मोटार वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव अर्ज सादर करण्यासाठी विहीत केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक आहे.
5] शारिरीक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणी: जवान व जवान-नि-वाहनचालक या पदांच्या शारिरीक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्हयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी, जिल्हा निवड समितीमार्फत, खालीलप्रमाणे घेण्यात येईल.
लेखी परीक्षेकरीता नकारात्मक गुणदान :-
I) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५% किंवा ५ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/ कमी करण्यात येतील. 2) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील वपुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. 3) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
निवडप्रक्रिया : Darubandi Police Bharti 2025
- लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुटंकलेखक या पदाकरिता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान ४५% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीतील प्रवर्ग निहाय नमुद केलेल्या पद संख्येच्या या कमाल प्रमाणात प्रवर्ग निहाय उमेदवारास लघुलेखनाची कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.
- लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुटंकलेखक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांवर निवड करताना लेखी परीक्षा आणि लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी पडताळणी नंतर मिळालेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणानुक्रमे निवड यादी अंतिम करण्यात येईल.
- जवान, राज्य उत्पादन शुल्क व जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क या पदा ंकरिता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान ४५% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीतील प्रवर्ग निहाय नमुद केलेल्या पद संख्येच्या १:१० या कमाल प्रमाणात प्रवर्ग निहाय उमेदवारास शारिरीक पात्रता पडताळणी व शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.
- जवान, राज्य उत्पादन शुल्क व जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांवर निवड करताना लेखी परीक्षा आणि शारिरीक पात्रता पडताळणी नंतर होणाऱ्या मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणानुक्रमे निवड यादी अंतिम करण्यात येईल. १०.५ सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारण
- तसेच शासनाकडून सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल :- १) “स्वीय सहायक-गट ब”, “उच्चश्रेणी लघुलेखक-गट ब”, “निम्नश्रेणी लघुलेखक-गट व” आणि “लघुलेखक- गट क” पदांचे (सेवाप्रवेश) नियम, १९९७ २) राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, पेटी ऑफिसर, जवान-नि-वाहनचालक आणि जवान पदांचे ३) महाराष्ट्र शासनाच्या विभागातील व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील गट “ड” पदांचे (सेवाप्रवेश) नियम, 4) अंतिम निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणा-या उमेदवारांची क्रमवारी (Ranking) ठरवण्यात येईल.
जिल्हा (परीक्षा) केंद्र निवड :-
- अर्ज सादर करतानाच जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
- जिल्हा (परीक्षा) केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
- एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा (परीक्षा) केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुस-या जिल्हा केंद्रावर करण्यात येईल.
- एकदा निवडलेल्या जिल्हा केंद्रामध्ये अथवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (T.C.S.) ने निश्चित केलेल्या परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
- वरीलप्रमाणे जिल्हा केंद्रनिवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवासाच्या पत्त्याच्या आधारे संबंधित महसुली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल, याबाबत शासनाचे त्या त्या वेळचे धोरण व निर्णय अंतिम मानण्यात येईल,
त्यामुळे जे उमेदवार पोलिस विभागांत नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी उत्तम संधी आहे. मोठ्ठी भरती जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
Darubandi police Bharti 2023
Darubadi. Police. Barti
Barti
My Frome