सरकारी नोकरी : ससून रुग्णालय, पुणे येथे विविध पदांची भरती सुरू! | वेतन – 1,20,000 रूपये | आजचं अर्ज करा | Sassoon Govt. Hospital Pune Bharti 2023

तुम्ही नोकरी शोधताय? संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील रुग्णसेवा याकरिता चिकित्सालयीन तसेच अतिविशेषोपचार विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे संस्थास्तरावरून करार तत्वावर ३६४ दिवसांकरिता तात्पुरत्या नियुक्तीने भरण्यांकरिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यांत येत आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांकडून मागविण्यांत येत असलेले अर्ज संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या www.med-edu.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते दि. १४/१०/२०२३ रोजी सायंकाळी ०५ वाजेपर्यंत (शासकीय सुटटी बगळून) अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील. अधिक माहिती व जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पदाचे नाव, विषय व मासिक वेतन खालील टेबल :

अ. क्र.पदे विषय दरमहा मानधन
1प्राध्यापक अतिविशेषोपचार2,30,000 रूपये
2सहयोगी प्राध्यापक अतिविशेषोपचार2,10,000 रूपये
3प्राध्यापक चिकित्सालयीन1,85,000 रूपये
4सहयोगी प्राध्यापक चिकित्सालयीन1 ,70,000 रूपये

महत्वाची माहिती :

  • उमेदवार हा भारताचा नागरिक व महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • उमेदवाराचे वय नियुक्ती वेळेस दि. २५/९/२०२६ वर्षा जास्त नसावे.
  • प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पध्दतीने नियुक्तीसाठी त्या त्या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकाबरोबरच कोणत्याही वयोगटाचे राष्ट्रीय आयुविज्ञान आयोगाने विहीत केलेली आवश्यक अर्हता धारण करणारे खाजगी वा अन्य क्षेत्रातील उमेदवार (बिगर सेवानिवृत्त) पात्र असतील.
  • मानधन (अ) सेवानिवृत्त अध्यापकांची करार पध्दतीने नियुक्ती झाल्यास त्यांना या निर्णय दि.१७.१२.२०१६ मधील तरतुदीनुसार दरमहा मानधन अनुज्ञेय असेल.
  • गुणांचन पध्दत:- जाहिरातीसोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद करण्यांत आलेली आहे.
  • परिशिष्ट-अ मध्ये नमूद गुसार अ.क्र. १ ते ४ वरील एकूण ८५ गुणांच्या आधारे तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार उमेदवारांना प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी व मुलाखतीस पात्र ठरविण्यांत येईल.
  • प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी गुलाबती अंती १०० गुणांपैकी किमान ४१ किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांचाच करार तत्वावरील नियुक्तीकरिता विचार केला जाईल.
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

नियम व अटी :

  • करार पध्दतीने नियुक्तीचा कालावधी हा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यत अथवा ३६४ दिवसांचा कालावधी यापैकी जे अगोदर घडेल इतका राहिल. तथापि सदरहू पदावर नियमित उमेदवार उपलब्ध झाल्यास कंत्राटी उमेदवाराच्या पदस्थापनेत बदल करुन देण्याचे अधिकार आयुक्त यांना राहतील.
  • उमेदवाराचे कामकाज समाधानकारक नसल्यास, गंभीर स्वरुपाची अनियमितता व गैरवर्तणूक या कारणासाठी त्याची नियुक्ती कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय संपुष्टात येईल.
  • करार पध्दतीने उमेदवारांने प्रस्थापित मानकांनुसार अध्यापन, रुग्णसेवा व अधिष्ठाता यांनी नेमून दिलेली विवक्षित कामे पार पाडणे आवश्यक राहील.
  • वरीलप्रमाणे विहित कामकाज पार पाडल्यानंतर महाविद्यालयीन व रुग्णालयीन कर्तव्य व जबाबदा-यांवर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन उमेदवारास खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्याची मुभा राहील.
  • करार पध्दतीने नियुक्त उमेदवारांना नियमित नियुक्तीसाठी कोणताही हक्क राहणार नाही तसेच सदर कालावधी कोणत्याही सेवा प्रयोजनासाठी ग्राहय धरला जाणार नाही.
  • करार पध्दतीने नियुक्त उमेदवारास त्यांच्या सेवा कालावधीत केवळ नैमित्तिक रजा अनुज्ञेय असतील.
  • करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणा-या कागदपत्रे / माहिती आधारसामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील.
  • करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान करण्यात येणार नाही.

विशेष माहिती :

  • उमेदवारास नियुक्ती देण्यात आल्यानंतर किमान एक शैक्षणिक सत्र संपेपर्यत त्यास कोणत्याही परिस्थितीत सेवा सोडता येणार नाही. तशा आशयाचे शपथपत्र उमेदवारास नियुक्तीपूर्व सादर करणे बंधनकारक असेल. असे शपथपत्र सादर करणा-या उमेदवारास कारार पध्दतीने नियुक्ती देण्यात येईल. शैक्षणिक सत्र चालू असलेल्या कालावधीत विद्यार्थीहीत विचारात घेता उमेदवाराचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.
  • बिगर सेवानिवृत गटातून करार पध्दतीने नियुक्त होणा-या अध्यापकांची नंतरच्या काळात नियमित नियुक्ती झाल्यास त्याला पूर्वीच्या सेवेचे कोणतेही लाभ अनुज्ञेय असणार नाही.
  • अर्जदाराने संबंधित पदासाठी शारीरीकदृष्टया पात्र असल्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करावे.
  • सदर जाहिराती मधील नमूद पदसंख्येत बदल करणे / सदरची जाहिरात पुर्णताः रदद करण्याचा अधिकार अधिष्ठाता स्वतःकडे राखून ठेवला आहे.
  • नमूद रिक्त पदांच्या संख्येत बदल करणेबाबतचे सर्व अधिकार अधिष्ठाताकडे राहतील.
  • अर्जदाराने त्यांच्या निवडीसाठी समितीवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकरचा दबाव आणल्यास त्यास निवड प्रक्रीयेतून बाद करण्यात येईल
  • अर्जदाराचे नाव महाराष्ट्र वैद्यकीय मंडळ अधिनियम १९६५च्या अंतर्गत कायम नोदणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र किवा भारतीय वैद्यकीय परिषदेचे कायम नोदणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल .( मुलाखतीचे वेळापत्रक वेगळयाने कळविण्यात येईल .
  • मुलाखतीला येताना उमेदवारांनी Online सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे मुळ कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक राहील.
  • अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Leave a Comment