सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये 02109 विविध पदांसाठी ऑनलाईन भरती सुरू | पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण | PWD Maharashtra Bharti 2023

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत खालील १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांच्या सरळसेवा भरती करीता मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या वरील संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील तसेच सेवाप्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता व पात्रता सोबतच्या खाली दिल्या आहेत. परीक्षा दिनांक :- याबाबतची माहिती http://mahapwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणान्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पदाचे नाव, वेतनश्रेणी व एकूण पदे : PWD Maharashtra Bharti 2023

अ. क्र.पदाचे नाव मासिक वेतन एकूण पदे
1शिपाई 15,000 ते 47,600 रू.41
2स्वच्छक 15,000 ते 47,600 रू.32
3वाहनचालक 19,9 00 ते 63,200 रू.2
4प्रयोगशाळा सहाय्यक 21,700 ते 69,100 रू.5
5वरिष्ठ लिपिक 25,500 ते 81,100 रू.27
6स्वच्छता निरीक्षक 25,500 ते 81,100 रू.1
7सहायक कनिष्ठ वास्तु शाश्रज्ञ 32,000 ते 1,06,600 रू.9
8उद्यान पर्यवेक्षक35,400 ते 1,12,400 रू.12
9लघुलेखक (निम्नश्रेणी)41,800 ते 1,32,300 रू.2
10लघुलेखक (उच्चश्रेणी)44,900 ते 1,42,400 रू.8
11स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक25,500 ते 81,100 रू.1378
12कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ41,800 ते 1,32,300 रू.5
13कनिष्ठ अभियंता (विद्युत)41,800 ते 1,32,300 रू.55
14कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)41,800 ते 1,32,300 रू.532

पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी : PWD Maharashtra Bharti 2023

  • पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सुचनेनुसार बदल (कमी/वाढ होण्याची शक्यता आहे.
  • पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी सा.बां. विभागाच्या http://mahapwd.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तृत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. महिलांसाठी आरक्षित पदांकरीता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे. तसेच शासन महिला व बालविकास विभाग निर्णय अन्वये खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करणेत आलेली आहे. तसेच, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणाऱ्या महिलांना त्या-त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. ४.५ एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यास तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले जात प्रमाणपत्र (Cast Certificate) उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असले तर संबंधित जात/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.
  • समांतर आरक्षाबाबत शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्लूएस) उमेदवारांकरीता शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
  • जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गटामध्ये मोडत नसल्याचे नॉन -क्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या वैधतेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.
  • सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेतमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल.
  • अराखीव (खुला) उमेदवारांकरीता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पुर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित / उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मुळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.

पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी : PWD Maharashtra Bharti 2023

  • सर्व पदांसाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्यांचेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • सर्व पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासन महसूल व वन विभाग निर्णय नुसार ज्या उमेदवाराकडे अधिवास प्रमाणत्र (Domicile Certificate) उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला (Birth Certificate) सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. सदर उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास, त्या उमेदवाराने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतू सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या उमेदवाराचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतू महाराष्ट्र राज्यातील रहिवास सलग १५ वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक राहील. ५. ३ उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र (Cast Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) निवडी अंती सादर करणे आवश्यक आहे.
  • जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय मधील तरतूदीनुसार, याचिका क्र. २१३६/२०११ व अन्य याचिकांवर मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. २५.८.२०११ रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या एसएलपी मधील आदेशाच्या अधीन राहून तात्पुरते नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ०६ महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांची नियुक्ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल.
  • उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. परिक्षेसाठी नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी १ तास ३० मिनिटे (९० मिनिटे) अगोदर उपस्थित रहावे.
  • नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास शासन वित्त विभाग निर्णय नुसार लागू करण्यात आलेली नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना (New Defined Contributory Pension Scheme) लागू राहील. त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाहनिधी योजना लागू राहणार नाही. तथापि, सदर नियमात भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील. अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राचे आधारे कागदपत्रे तपासणीवेळी तपासण्यात येतील. सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी उपलब्ध करून देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधीत उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

आवश्यक वयोमार्यादा : PWD Maharashtra Bharti 2023

अ. क्र.प्रवर्ग किमान वय कमाल वय
1अमागास1840
2मागासवर्गीय / अनाथ /
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
1845
3प्राविण्यप्राप्त खेळाडू1845
4माजी सैनिक1843
5दिव्यांग1845
6प्रकल्पग्रस्त आणि भुंकपग्रस्त1845
7पदवीधर अंशकालीन1855

परीक्षा व परीक्षेचे स्वरुप :- PWD Maharashtra Bharti 2023

  • परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील. सर्व पदांकरीता मौखिक (मुलाखती) परीक्षा घेण्यात येणार नाहीत.
  • उमेदवारांची निवडसूची तयार करणेसाठी शासन सामान्य प्रशासन विभाग नुसार कार्यवाही करण्यात येईल.
  • गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • परीक्षेचा निकाल (निवडसूची) तयार करतांना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय मध्ये नमूद निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल.
  • प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत उमेदवारास काही हरकत असल्यास प्रति प्रश्न रुपये १००/- इतके शुल्क आकारले जाईल. तसेच परीक्षेच्या समाप्ती दिनांकापासून सात (०७) दिवसाच्या आत प्राप्त असलेल्या हरकती विचारात घेण्यात येईल.
  • परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. Normalization साठीचे सूत्र संकेतस्थळावर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे. सदर (Normalization) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.
अधिकृत जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

इतर महत्वाच्या सूचना :- PWD Maharashtra Bharti 2023

  • निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा त्यांना लेखी सूचना दिली जाणार नाही.
  • उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारीच्या संबंधात कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा दबाव आणण्याचा किंवा गैरप्रकारचा अवलंब केल्यास त्याची उमेदवारी अपात्र ठरवली जाईल.
  • भरतीप्रक्रिया / परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अशंतः बदल करणे तसेच भरती प्रक्रिये संदर्भात वाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेणे, पडताळणीअंती अर्ज रद्द ठरविणे, निवड प्रक्रियेत वेळेवर बदल करणे, उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादीस मान्यता देणे, जाहिरातीच्या अनुषंगाने योग्यती कार्यवाही करणे याबाबतचे संपूर्ण अधिकार शासन सा.बां. विभाग मंत्रालय मुंबई/ राज्यस्तरीय समन्वय समिती यांना राहतील. उमेदवारांना परीक्षेकरीता, कागदपत्रे पडताळणीकरीता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षा शुल्क ना परतावा राहील.
  • मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे, कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना दिलेले भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईक क्रमांक) व ई-मेल आयडी कृपया भरती प्रक्रिया संपेपर्यंत बदलू नयेत.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे, जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • चुकीची / खोटी प्रमाणपत्र सादर करणारा उमेदवार कायदेशीर कारवाईस पात्र राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये अर्ज करावयाचे असल्यास तो त्यांच्या कार्यालय प्रमुखाच्या परवानगीने विहीत मार्गाने व विहीत मुदतीत भरणे आवश्यक राहील.
  • कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास शिफारस/नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

Leave a Comment