पुणे महानगरपालिका भरती 2023 | Pune Mahanagarpalika Bharti 2023

पुणे महानगरपालिका अंतर्गत समाज विकास विभागाकडील प्रशिक्षण केंद्रातील विविध अस्थायी पदांवर मानधन तत्वावर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशीलवार तक्ता, त्यानुसार पदांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, सदर पद भरतीसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती, गुणदान पद्धतीचा तक्ता, उमेदवाराने सादर करावयाचा अर्जाचा नमुना खाली देण्यात आलेला आहे. नमूद केलेली शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व अनुभवधारक उमेदवारांनी दि. १४/१२/२०२३ ते दि.२६/१२/२०२३ (कार्यालयीन सुट्ट्या वगळून) या कालावधीत सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत एस. एम. जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे येथे विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सादर करावेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरती विषयी आवश्यक माहिती :

पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती विषयी माहिती, पदे, शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहिती खाली दिली आहे.

अ. क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण पदे
1फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, अडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षकएक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण1
2वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरुस्तीप्रशिक्षकएक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय. टी. आय उत्तीर्ण1
3फ्रिज एसी दुरुस्ती प्रशिक्षकविषयाकिंत डिप्लोमा/शासनमान्य आय.टी.आय. उत्तीर्ण1
4मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षकडिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक) / विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण1
5फॅशन डिझायनिंग प्रशिक्षकशिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचा प्रशिक्षकन पुर्ण3
6एम्ब्रॉयडरी प्रशिक्षकविषयाकिंत एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण1
7ब्युटीपार्लर प्रशिक्षकब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उतीर्ण3
8दुचाकी वाहन प्रशिक्षकएक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग / एन.सी.टी.व्हि.टी. उत्तीर्ण1
9दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यकविषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण1
10चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षकएक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण/ डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग1
11चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यकविषयांकित किमान सहा महिने कालावधीचेप्रशिक्षण उत्तीर्ण1
12कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षकइ. १२ वी उत्तीर्ण च शासकिय टंकलेखन परीक्षा इंग्रजी ६० श.प्र.मि., मराठी ४० श.प्र.मि व हिंदी ४० श.प्र.मि. उत्तीर्ण,2
13इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षकबी.ए (इंग्लिश) / एम. ए(इंग्लिश)3
14जेन्टस् पार्लर (बेसीक व अडव्हान्स) प्रशिक्षकब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण1
15संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षकबी.ई. (इलेक्ट्रॉनिक)2
16संगणक बेसिक MS-CIT, TALLY, 9.0 ERA, DTP &CC++ प्रशिक्षकबी.सी.ए./एम.सी.ए./बी.सी.एस./ एम.सी. एस./एम. सी.एम/आय.टी.6
17शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र)1
18एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार1
19प्रशिक्षण केंद्र समन्ययकMSW/ पदवीधर. MSW उमेदवारास प्राधान्य देणेत येईल3
20प्रकल्प समन्वयकMSW/ पदवीधर. MSW उमेदवारास प्राधान्य देणेत येईल2
21प्रशिक्षण केंद्र – कार्यालयीन सहाय्यककिमान १२ वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग शब्द प्रति मिनीट ३० किंवा इंग्रजी टायपिंग शब्द प्रति मिनीट ४०, एम.एस.सी. आय. टी3
22प्रशिक्षण केंद्र-स्वच्छता स्वयंसेवकसाक्षर 3

इतर आवश्यक माहिती : Pune Mahanagarpalika Bharti 2023

१) वरील पदांवरील नेमणूका शैक्षणिक पात्रता, शासकीय व निमशासकीय विभागाकडे काम केल्याचा अनुभव व समाज विकास विभागाकडील (नागरवस्ती विकास योजना) कामाचा अनुभव इ. च्या आधारे परिक्षण करून व गुणानुक्रमे निवड व प्रतिक्षा यादी तयार करून सहा महिने मुदतीकरीता दरमहा एकवट मानधनावर तसेच बॅच निहाय करार पद्धतीने नेमणूक करण्यात येतील.
२) वरील अ.क्र.१ ते १८ या या पदांकरिता समाज विकास विभागाकडील कामाचा अनुभव असणा-या उमेदवारांकरिता वयोमर्यादा वय वर्षे ५८ पर्यंत व इतर उमेदवारांना शासन निर्णयानुसार मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयोमर्यादा वय वर्ष ४३ व खुल्या गटातील उमेदवारांसाठी वय वर्ष ३८ पर्यंत अर्ज करू शकतील.
३) खालील तक्त्यात नमूद शैक्षणिक पात्रता धारण करणे व अनुभव असणे आवश्यक आहे.
४) अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालान्त परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची स्वयं-साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
५) अर्जदार महिला विवाहित असल्यास शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गॅजेटची (राजपत्र) स्वयं-साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
६) कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी मराठी टायपिंग शब्द प्रती मिनीट ३० किंवा इंग्रजी टायपिंग शब्द प्रती मिनीट ४० उत्तीर्ण असल्याचे महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एक्झेंमिनेशन यांचे व महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांचे एम.एस.सी.आय.टी. कोर्स अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
७) अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे दाखले, अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून व पानवारी (पेजींग) करून एस. एम. जोशी हॉल, ५८२ रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे-११ या ठिकाणी अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून दि. १४/१२/२०२३ ते दि.२६/१२/२०२३ (कार्यालयीन सुट्ट्या वगळून) या कालावधीत सकाळी ११.०० ते दुपारी २.०० पर्यंत सादर करणेत यावा, टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उपरोक्त कागदपत्रांच्या मूळ प्रती निवड झालेल्या उमेदवारांनी रूजू होताना दाखविणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र सोबत कागदपत्रे साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

इतर अटी : Pune Mahanagarpalika Bharti 2023

  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसल्यास तसेच अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याच्या प्रती जोडलेल्या नसल्यास, अर्जासोबत दिलेली माहिती व मूळ कागदपत्रांत काही दोष आढळल्यास अशा नेमणूका बाद करण्यात येतील.
  • निवड झालेल्या उमदेवारांना विहीत नमुन्यात करारनामा करून फक्त ०६ महिन्यांकरीता नेमणूक दिली जाईल. त्यानंतर करार संपल्यानंतर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल, त्याकरिता पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • निवड झालेल्या उमेदवाराने करारनामा करणे आवश्यक आहे. सदर करारनामा स्वखर्चाने करून द्यावा लागेल. १२. निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार मा. अति. महापालिका आयुक्त (इ.), पुणे महानगरपालिका, पुणे यांनी राखून ठेवले आहेत.
  • अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • सदर नियुक्त्या मानधन तत्वावर सहा महिने मुदतीकरीता होणार असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना मनपाच्या आस्थापनेवरील कोणत्याही पदावर कायमस्वरूपी नियुक्तीकरीता हक्क सांगता येणार नाही, तसेच मनपा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेले कोणतेही लाभ मिळण्यास ते पात्र ठरणार नाहीत. १५. वरील पदासाठी कामाचे स्वरूप ठरविण्याचे अधिकार मा. खातेप्रमुख यांना राहील.
  • निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारक करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रूजू होण्यापूर्वी एका महिन्याचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल. त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही.

Leave a Comment