पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 | PCMC Bharti 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ केवळ या कालावधीसाठीच ऊर्दु, हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र कला शिक्षक यांची एकत्रित मानधन तत्वावर ११ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करणेसाठी शैक्षणिक अर्हता धारण करणान्या उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ केवळ या कालावधीसाठीच ऊर्दु, हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र कला शिक्षक यांची एकत्रित मानधन तत्वावर ११ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करणेसाठी शैक्षणिक अर्हता धारण करणान्या उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत.

अ. क्र.पद शैक्षणिक अहर्ता वेतन एकूण पदे
1कला शिक्षक Art Teacher Diploma (ATD) Govt. Diploma (GD) Art of Fine Art Bachelor of Fine Arts (BFA) | Master of Fine Arts (MFA) कोर्स उत्तीर्ण28,000 रूपये 32

अटी व शर्थी : PCMC Bharti 2023

  • उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेली शैक्षणिक अर्हता- HSC, Art Teacher Diploma (ATD) Govt.Diploma (GD) Art of Fine Art, Bachelor of Fine Arts (BFA), Master of Fine Arts (MFA) कोर्स उत्तीर्ण किंवा चित्रकला विषयातील समकक्ष पदवीका व पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र, तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्राच्या सत्य प्रती सादर करणे बंधनकारक आहे.
  • Art Teacher Diploma (ATD) Govt. Diploma (GD) Art of Fine Art कोर्स प्रथम श्रेणी उत्तीर्ण उमेदवारास १० गुण दिले जातील व द्वितिय श्रेणी उत्तीर्ण उमेदवारास ५ गुण दिले जातील. Bachelor of Fine Arts (BFA) कोर्स प्रथम श्रेणी उत्तीर्ण उमेदवारास २० गुण दिले जातील व द्वितिय श्रेणी उत्तीर्ण उमेदवारास १५ गुण दिले जातील. Master of Fine Arts (MFA) कोर्स प्रथम श्रेणी उत्तीर्ण उमेदवारास ३० गुण दिले जातील व द्वितिय श्रेणी उत्तीर्ण उमेदवारास २५ गुण दिले जातील. ज्या उमेदवाराना ६०% पेक्षा जास्त गुण असल्यास ते प्रथम श्रेणी मध्ये धरणेत येतील व त्यापेक्षा कमी गुण असलेस ते द्वितिय श्रेणी मध्ये धरणेत येतील.
  • अनुभव:- उमेदवारास ६ महिन्या पेक्षा कमी अनुभव असल्यास गुण दिले जाणार नाही. ६ महिने ते २ वर्ष अनुभवासाठी ५ गुण दिले जातील. २ वर्ष ते ५ वर्षासाठी १० गुण दिले जातील. ५ वर्ष व त्या पेक्षा जास्त अनुभवासाठी १५ दिले जातील. कला शिक्षक या पदासाठी फक्त शाळेतील अध्यापनाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल.
  • ज्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागास सदर सहा. शिक्षकांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशी शिवाय सदर उमेदवारांची सेवा संपृष्टात आणण्यात येईल. या संबधीचे सर्व अधिकार मा. अतिरिक्त आयुक्त १ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राखुन ठेवले आहेत. तसेच पात्र उमेदवारांना नेमणुक देताना शिक्षक संख्या कमी/जास्त करण्याचा अधिकार मा. अति. आयुक्त (१) सो.पिं.चिं. मनपा यांचा राहील.

कला शिक्षक गुण विभागणी : PCMC Bharti 2023

अ. नं.शैक्षणिक अहर्ता प्रथम श्रेणी गुण द्वितीय श्रेणी गुण
1Art Teacher Diploma (ATD) Govt. Diploma (GD) Art of Fine Art105
2Bachelor of Fine Arts (BFA)2015
3Master of Fine Arts (MFA)3025

विशेष माहिती : PCMC Bharti 2023

  • उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात कला शिक्षक या पदासाठी अर्ज मा. अति. आयुक्त (१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा. सदरचा अर्ज दि. ०६/११/२०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यत समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव, येथे वेळेत सादर करावा.
  • निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित मानधना व्यतिरीक्त मनपा मार्फत देण्यात येणाऱ्या कोणत्याही सोयी सुविधा हक्क व इतर आर्थीक लाभ व भत्ते देय राहणार नाहीत. (उदा. दिवाळी बोनस तथा सानुग्रह अनुदान)
  • अर्जदाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर तसेच नियुक्ती झाल्यानंतरही अर्जदार विहित अर्ज/पात्रता धारण न करणारा, गैरवर्तन करताना दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास संबंधिताची उमेदवारी अथवा निवड रद्द करणेत येईल, तसेच काही आक्षेप आढळल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करणेत येईल.
  • विहीत मुदत काळात प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परस्थितीत करणेत येणार नाही. अर्जदाराने आपले अर्ज महापालिकेच्या जाहीरातीमध्ये विहित केलेल्या अर्जाप्रमाणे करणे बंधनकारक राहील. अन्यथा अर्ज बाद केले जातील.
  • अपूर्ण माहिती व अटींची पुर्तता न करणा-या उमेदवाराचे अर्ज बाद करून अपात्र ठरविले जातील. अपात्र अर्ज कार्यालयात जमा करणेत येतील. याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • सदरची निवड ही कला शिक्षक पदासाठी केवळ तात्पुरत्या एकत्रित मानधनावर हंगामी स्वरूपाची आहे. उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही. सदरचे पद हे शैक्षणिक वर्ष २०२३ २४ या करीता व आवश्यकतेनुसार राहील.
  • तसेच पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक उपलब्ध झाल्यास एकत्रित मानधनावरील नियुक्त्या रद्द करण्याचे अधिकार मा. अति.आयुक्त (१) सो.पिं.चिं. मनपा यांचा राहील
  • नियुक्तीच्या वेळी उमेदवारास रक्कम रूपये ५००/- स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड करून) मनपा सेवेत भविष्यात नोकरी बाबतचा कोणताही हक्क राहणार नाही. तसेच न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सदरची जाहीरात व अर्जाचा नमुना महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर पाहता येईल. जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय मा. अति. आयुक्त (१) सो.पिं.चिं. मनपा यांचा राहील.
अधिकृत जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

PCMC Bharti 2023 : पिंपरी येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Leave a Comment