नाशिक जिल्हयातील सुरगाणा, पेठ, दिंडोरि, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, चांदवड, देवळा, नाशिक तालुका, सिन्नर, निफाड, बागलाण [सटाणा], मालेगांव, येवला या तालुक्यातील पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे. खालील संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती बाबत अदयावत राहण्याची जबाबदारी उमेदवार यांची राहणार आहे. सदर सर्व उपविभागातील व तालुक्यातील रिक्त पदे भरायची असून भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
नाशिक पोलीस पाटील भरती 2023 | Nashik Police Patil Bharti 2023 | महत्वाचे दिनांक
अर्ज सुरू होण्याची दिनांक व अर्ज करण्याची अंतिम दिनांक खाली पहा.
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरवात | ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत |
दिनांक 26/09/2023 स.10-00 वा. पासून | 08/10/2023 रोजी सांय 05.45 वा पर्यंत |
पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता | नाशिक पोलीस पाटील भरती 2023 | Nashik Police Patil Bharti 2023
- अर्जदार हा दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा.
- (अ) वयोमर्यादे करीता अर्जदारचे दिनांक 26/09/2023 रोजीचे वय विचारात घेतले जाईल. (ब) अर्जदाराचे वय दिनांक 26/09/2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.(क) पोलीस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
- अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा. ( अर्जदाराने शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, इतर ओळखपत्र, आधारकार्ड, स्वयंघोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिध्द होते, अशा कोणत्याही एक पुराव्याची प्रत अर्जसोबत जोडणे आवश्यक राहील, व मुलाखातीचे वेळी मुळ पुरावा सादर करणे आवश्यक राहील.)
- अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा ई-मेल य नंबर नमूद करणे अनिवार्य आहे.
- अर्जदार शारीरिकदृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चरित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटूंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
- मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल.
- इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज ब, क, ड या प्रवर्गातील अर्जदार यांना भरती कालावधी करीता वैध असलेले उन्नत आणि प्रगत गटात (क्रिमीलेअर) या मध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
- इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा अ व भज- य, क, ड या प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना भरती कालावधी करीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
नाशिक जिल्ह्यातील भरती होणारे तालुके :
सुरगाणा, पेठ, दिंडोरि, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, चांदवड, देवळा, नाशिक तालुका, सिन्नर, निफाड, बागलाण [सटाणा], मालेगांव, येवला या तालुक्यांमध्ये भरती सुरू झाली आहे. सर्व तालुक्यांच्या जाहिराती खाली दिल्या आहेत.
परीक्षा स्वरूप | नाशिक पोलीस पाटील भरती 2023 | Nashik Police Patil Bharti 2023
पोलीस पाटील पदाची लेखी परिक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील. लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची असणार आहे.
लेखी परीक्षा गुण | तोंडी परीक्षा गुण | एकूण गुण |
80 गुण | 20 गुण | 100 गुण |
- लेखी परिक्षा इयत्ता दहावी (एस. एस. सो.) पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य. बुध्दीमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल.
- लेखी परिक्षेत एकूण 80 गुणांपैकी किमाण 36 गुण (45%) प्राप्त केलेल्या अर्जदारा मधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदाराची तोंडी परिक्षा घेण्यात येईल.
- लेखी परिक्षा घेतेवेळी उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळया शाईचा बॉलपेन वापर करावा लागेल.
- लेखी परिक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारास पोलीस पाटील भरती / निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोडी (मुलाखत) परिक्षेस उपस्थित राहणे अनिवार्य राहील तोड़ी परिक्षेत अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र गुणवत्ता ठरेल. मात्र एखादया उमेदवाराला मुलाखतीत शुन्य गुण मिळाले असले तरी लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे तो जर यादीत येत असेल तर असा उमेदवार पोलीस पाटील पदावरील निवडीकरिता पात्र राहील.
सर्व तालुक्यांच्या जाहिराती | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
निवड कार्यपध्दती, अटी व शर्ती :- नाशिक पोलीस पाटील भरती 2023 | Nashik Police Patil Bharti 2023
- प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदारांस पात्रता व इतर संबंधीत मुळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करुन दयावी अन्यथा तोंडी परिक्षा अंतिम निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही.
- लेखी परिक्षा, तोड़ी परीक्षा, कागदपत्रे छाननी इ. करीता तसेच प्रवेशपत्र भरती कार्यक्रम, विविध सूचना या केवळ संकेतस्थळावरुनच उपलब्ध करण्यात येतील. पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार नाहीत. सबब सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती / कार्यक्रमा बाबत अद्ययावत राहण्याची प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल.
- लेखी परिक्षेअंती मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांचे जाहीरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मुळ कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता अंतरीम स्वरुपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या अर्जदाराची जाहीरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती परिक्षा शुल्क कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिध्द होईल अशाच अर्जदाराचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्याकरीता करण्यात येईल.
अर्ज कसा करावा : नाशिक पोलीस पाटील भरती 2023 | Nashik Police Patil Bharti 2023
- प्रस्तुत पदांकरीता फक्त https://nashik.ppbharti.in या अधिकृत संकेतस्थळावरून विहित पध्दतीने भरलेले ऑनलाईन पध्दतीने केलेले अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक चूकीचा / अपुर्ण तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर्ड (DND) असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिये दरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणा-या सूचना, संदेश व माहीती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. तसेच ई-मेल आयडी व मोबाईल संदेश वहनात येणा-या तांत्रिक अडचणीना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कळवण हे जबाबदार असणार नाही. सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल.
- पात्र उमेदवाराला वेब बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज https://nashik.ppbharti.in या वेबसाईटद्वारे दि. 26/09/2023 ते दि. 08/10/2023 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
- उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना, शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. तथापि, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहील्यास व भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही, जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण वगैरेची पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज भरावा.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://nashik.ppbharti.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑन लाइन पध्दतीने शुल्क भरणा-या उमेदवारांनी त्यांचा व्यवहार यशस्वी (Payment Transaction Successful) झाल्याची खात्री करुन घ्यावी प्रकीया शुल्क भरण्याकरीता नेट बँकींग डेबीट कार्ड / क्रेडीट कार्ड वापरुन होणा-या व्यवहाराची संपुर्णत: जबाबदारी उमेदवाराची आहे व उप विभागीय दंडाधिकारी कार्यालय, कळवण यास जबाबदार असणार नाही.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना स्वतःचा अद्यावत (Latest) विहीत नमुन्यातील पासपोर्टसाईझ फोटो व सही स्कॅन करुन https://nashik.ppbharti.in मधील सुचनेनुसार विहीत पध्दतीने अपलोड करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारीख व वेळेनंतर संकेत स्थळावरील ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल.
- ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेच्या सर्व टप्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहीत परिक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती परिक्षेची रुपरेषा वेळापत्रक /परिक्षा केंद्र/ बैठक क्रमांक इत्यादीबाबत ची माहिती वर दिलेल्या (वेबसाईट) वर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येईल. यासंबधी स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
Police patil
M. Com
Official job
Nashik polis patil
Hi
Job presentation..