आरोग्य विभाग – महानगरपालिका नागपूर मध्ये नवीन पदांची भरती सुरू! Nagpur Mahanagarpalika Bharti 2023

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 : आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवायची संधी शोधत आहात? तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत कंत्राटी स्वरुपात पदे भरण्याकरीता थेट मुलाखत दि. १७/१०/२०२३ रोजी घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेच्या मुळ कागदपत्र व झेरॉक्स संचासह मुलाखत स्थळी उपस्थित राहावे. पूर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मा. आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र, मुंबई यांचे दि २७/०४/२०२३ प्राप्त पत्रानुसार पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी पदाची 114 पदांकरीता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे. प्राप्त पत्रानुसार उमेदवारांच्या गुणांची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात येईल.

श्रेणी गुण
शैक्षणिक अहर्ता 50 गुण
थेट मुलाखत 50 गुण

थेट मुलाखतीची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात येत आहे :

a) Subject Knowledge-10
b) Research & Academic Knowledge 10
c) Leadership Quality – 10
d) Administrative Abilities -10
e) Experience-10 (For Govt Exp. 2 marks & For Pvt. Exp.- 1 marks)

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उमेदवारांना दोन्ही कार्यक्रमाकरीता ( १५ वा वित्त आयोग व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान ) अर्ज करावयाचा असल्यास स्वतंत्रपणे अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. तसेच दोन्ही अर्ज संलग्न करण्यात आले आहेत. अर्जाची प्रिंट काढुन आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स अर्जाला संलग्न करून मुलाखतीकरीता उपस्थितः राहावे.

भरावयाचा रिक्त पदांचा तपशील :

अ. क्र.कार्यक्रमाचे नाव पदांची संख्या व
जातीचा प्रवर्ग
शैक्षणिक अहर्ता मानधन
1 राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM)एसटी 1
EVS 1
खुला 3
भज (ड) 1
एकूण = 6
एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल
कॉन्सीलची नोंदनी आवश्यक,
अनुभव असल्यास प्राधान्य
60,000 रुपये
2१५ वा वित्त आयोगSC 15
एसटी 8
VJ (A) 3
NT-B 3
NT-C 4
NT-D 2
एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल
कॉन्सीलची नोंदनी आवश्यक,
अनुभव असल्यास प्राधान्य
60,000 रुपये

अटी व शर्थी :

  • अनुभवाच्या बाबतीत खाजगी, शासकीय, निम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • उमेदवारांनी जाहिरातीत नमुद पदासाठी मुलाखतीकरीता सकाळी १०.०० वाजता सर्व आवश्यक दस्ताऐवजांसह उपस्थित राहावे. सदरील पदे हि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही. पदांसाठीचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
  • वरील सर्व पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असल्याने त्यास नागरी सेवा नियम लागू होणार नाही.
  • एकुण पदांच्या संख्येत अथवा आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो.
  • सदरील पदे हि निव्वळ कंत्राटी पद्धतीने केवळ प्रकल्प कालावधी पुरते भरावयाचे असून प्रकल्प बंद होताच सदर पदे आपोआप संपुष्टात येतील.
  • मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
अधिकृत जाहिरात
व अर्ज
येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत ( Original) व साक्षांकित (Zerox) :

  • नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटो- १ व स्वतःचा ई-मेल व दुरध्वनी क्रमांक.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा राहिवासी असल्याचे प्रमाणपत्र.
  • जन्म तारखेचे प्रमाणपत्र (शाळा / महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र / जन्माचे प्रमाणपत्र ).
  • ओळखपत्र आधार कार्ड / मतदान कार्ड /ड्रायव्हिंग लायस.
  • पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रीका में पदानुसार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेशिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी ( PG Degree) आणि पदव्युत्तर पदवीका (PG Diploma) प्रमाणपत्र.

महत्वाची माहिती :

  • कोणत्याही वेळेस भरती अथवा निवड प्रक्रिया रद्द करण्याचे संपुर्ण अधिकार निवड समिती एन.यु.एच.एम. म. न. पा. नागपूर यांना राहतील त्यावर कोणतीही हरकत / आक्षेप घेता येणार नाही.
  • आवेदन पत्र स्विकृत/अस्विकृत करण्याचे अधिकार, निवड प्रक्रियेत वेळेवर बदल करण्याचे तसेच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याबाबतचे संपुर्ण अधिकारी अध्यक्ष निवड समिती तथा आयुक्त म.न.पा. नागपूर यांचेकडे राखुन ठेवलेले आहे.
  • उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाब आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
  • मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  • अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवाराने रुजु होतांना विहित नमुन्यात रुपये १००/- च्या बॉन्डपेपरवर करारनामा करुन द्यावा लागेल. (सेवेदरम्यान करारनाम्याच्या अटी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहिल.)
  • ज्या पदाकरीता बिंदू नामावलीनुसार राखीव प्रवर्गास अनुसरुन पदभरती जाहिरात दिल्यानंतर पुढील प्रक्रियेद्वारे अपेक्षित राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कालमर्यादेत राबविण्याचे अभियान आहे ही बाब लक्षात घेऊन ११ महिने कालावधीसाठी प्रतिक्षा यादीतील निवड केलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल.
  • राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत अधिनस्त असलेल्या यु.पी.एच.सी मधील कार्यरत असलेल्या वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ ) यांनी सदर पदभरती मध्ये अर्ज सादर करु नये. अर्ज सादर केल्यास त्यांचा सदर पदभरतीमध्ये विचार केल्या जाणार नाही. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान हा एकच कार्यक्रम असल्यामुळे दुसरीकडील पद रिक्त होऊन तेथील आरोग्यसंस्थेमध्ये सेवा प्रदान करण्यास व्यत्यय निर्माण होतो.
  • १५ वा वित्त आयोग या कार्यक्रमअंतर्गत जसजशा U-HWC कार्यान्वित होतील त्याप्रमाणे उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्या जाईल.

4 thoughts on “आरोग्य विभाग – महानगरपालिका नागपूर मध्ये नवीन पदांची भरती सुरू! Nagpur Mahanagarpalika Bharti 2023”

Leave a Comment