महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व गट-ड संवर्गातील शिपाई ही रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक ०२.१२.२०२३ पासून दिनांक २१.१२.२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत, या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरतीकरिता ऑनलाईन परीक्षा मुंबई व मुंबई उपनगर या परिसरातील ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रांवर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयाच्या आस्थापनेवरील संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व शिपाई ही रिक्त पदे भरण्यासाठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | शिपाई | 04 |
2 | ग्रंथालयीन सहायक | 01 |
3 | संपादकीय सहायक | 04 |
मिळणारे मासिक वेतन :
अ. क्र. | पदाचे नाव | मासिक वेतन |
1 | संपादकीय सहायक | S-१० : २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार) |
2 | ग्रंथालयीन सहायक | S-७:२१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार) |
3 | शिपाई | S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इत्तर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार) |
पात्रता : Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023
- उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा : जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक २१.१२.२०२३ रोजी गणण्यात येईल.संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व शिपाई या पदांसाठी किमान वय १८ वर्षे पूर्ण केलेले असावे.
- कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४५वर्षांपेक्षा) जास्त नसावे.
परीक्षा शुल्क :
1.अमागास : रु. १०००/-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : रु. ९००/- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.
2.परीक्षाशुल्क ना-परतावा (Non refundable) आहे.
3.कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित / रद्द झाल्यास पदभरती शुल्क उमेदवाराला परत करण्यात येणार नाही.
4.माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकांसाठी परीक्षाशुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज स्विकारण्याची पद्धती :
1.प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येतील.
2.पात्र उमेदवाराला ऑनलाईन अर्ज www.marathivishwakosh.org या संकेतस्थळावर ०२.१२.२०२३ पासून दिनांक २१.१२.२०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
3.विहित पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
अर्ज करण्यासाठी आवश्यक सूचना :
- उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आडनाव, आईचे नाव, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी इत्यादी मूलभूत माहिती उमेदवाराला सविस्तर द्यावी लागेल.
- उमेदवाराला अर्ज करावयाच्या पदाची निवड करावी लागेल. तसेच, उमेदवारास एकावळेस एकाच पदाची निवड करता येईल.
- पत्ता नमूद करताना उमेदवाराने आपल्या पत्याचा प्रकार निश्चित करावा. (उदा. पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमचा पत्ता किंवा दोन्ही) त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरावी.
- ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे, त्यांनी तत्संबंधी माहिती; भरावी तसेच उमेदवाराने आधार क्रमांक / आधार नोंदणी क्रमांक याबद्दलची माहिती द्यावी.
- संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. एकदा शैक्षणिक तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदारास पुढे (Next) या बटणावर क्लिक करावे लागेल, त्या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जदाराकडून पुष्टीची विनंती केली जाईल. त्यांनी ते बटण क्लिक केल्यास मागील तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेस रात्री २३.५९ वाजेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर संकेतस्थळावरील लिंक बंद होईल.
- जर कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा अधिक लॉग-इन आयडीसह नोंदणी केली असेल, तर उमेदवारांची नव्याने केलेली यशस्वी नोंदणी फक्त पुढील प्रक्रिया जसे परीक्षा प्रवेशपत्र, परीक्षेत उपस्थिती, गुणवत्ता यादी आणि अन्य संबंधित प्रक्रियांसाठी विचारात घेण्यात येईल.
- टीप: नोंदणीमधील तपशील जसे की, वापरकर्ता नाव (USERNAME), ई-मेल आयडी, पसंतीचे स्थान, जन्म तारीख, उमेदवाराचे छायाचित्र (Photograph) आणि स्वाक्षरी इत्यादी आवेदन पत्र सादर केल्यानंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.
निवड पद्धत : Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023
- सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल.
- संगणक आधारित परीक्षेद्वारे (Computer Based Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
- ऑनलाईन परीक्षेचा दिनांक व वेळ यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
- संगणक आधारित (Computer Based Examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा १०० प्रश्नांची व २०० गुणांची असेल. त्यासाठी १२० मिनीटांचा (२ तास) कालावधी राहील.
- उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.
- संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व शिपाई यामधील कोणत्याही पदासाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा (मुलाखत) घेण्यात येणार नाही.