महापारेषण अउदा संवसु विभाग, परभणी अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ नुसार शिकाऊ उमेदवार म्हणुन सन २०२३-२४ करीता वीजतंत्री (ईलेक्ट्रिशियन) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर अउदा संवसु विभाग परभणी च्या खालील आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख दि. १९/१०/२०२३ चे रात्री २३. ५९ वाजेपर्यंत राहिल. ऑनलाईन नोंदणी केलेल्या अर्जाची स्क्रिीन शॉट काढून त्याशी संबंधीत कागदपत्रे जोडून व जाहिरातीत नमुद पत्त्यावर सोबत दिलेला फॉर्म मध्ये संपुर्ण माहिती भरून खालील नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोस्टाने दिनांक २६/१०/२०२३ पर्यंत मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही तसेच उशिरा अर्ज प्राप्त झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही यांची नोंद घ्यावी. वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा अधिनियमानुसार १ वर्षाचा राहिल. अधिक माहिती खाली दिली आहे.
भरती विषयी माहिती टेबल मध्ये : Mahapareshan Bharti 2023
अउदा संवसु विभाग, परभणी अंतर्गत आय. टी.आय. विजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवारी अर्ज वर्ष २०२३ २४ या सत्रा करीता शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणा करीता भरती घेण्यात येत आहे. करीता खाली नमुद केलेल्या अटी व शर्तीना अधिन राहून इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी / उमेदवारांनी दि. १९/१०/२०२३ वे रात्री २३.५९ वाजे पर्यत www.apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर आस्थापना क. E05202700376 वर नोंदणी करावी.
आस्थापनेचा नाव व रजिस्ट्रेशन कंमाक | ट्रेड | एकुण |
अउदा संवसु विभाग, महापारेषण, परभणी | वीजतंत्री (Electrician) | एकुण जागा 29 |
उमेदवार / प्रशिक्षणार्थी / आरक्षण टक्केवारी खालील प्रमाणे :
- ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम दि. १२/१०/२०२३ ते १२/१०/२०२३ वे रात्री २३.५९ वाजे पर्यत राहिल. ३. वरील प्रमाणे अर्ज करणा-या उमेदवारांनी जाहिराती सोबत जोडलेल्या फॉर्म मध्ये अचुक माहिती भरून खालील नमूद केलेले दस्तऐवज (अनु.क्र.अ ते छ) (कंपनीच्या धोरणानुसार आरक्षण अंमलबजावणीसाठी आवश्यक ) ऑनलाईन अर्जाची Screen shot सह खालील नमुद केलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात दि. २६ / १० / २०२३ पर्यंत पोहचतील या बेताने पाठवावे. उशिरा अर्ज प्राप्त झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
- कार्यालयाचा पत्ता:- कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग परभणी १३२ के. व्ही. उपकेंद्र परिसर, जिंतुर रोड, गणपती चौक, परभणी.
विभागाचे नांव | एकूण जागा | टक्के | अ. जा. | अ. ज. | वि. जा. अ. | भ. ज. ब. | भ. ज. क. | इ. मा. व. | EWS | खुला |
अउदा संवसु विभाग परभणी | 29 | 100 | 4 | 2 | 1 | 1 | 1 | 6 | 3 | 11 |
भरतीसाठी खालील नमुद केलेले दस्ताऐवज आवश्यक असतील :
- apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर उमेदवाराची प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणुन नोंद असणे बंधनकारक आहे.
- जन्म तारखेसाठी १०वी ची सनद आवश्यक. क. इयत्ता दहावीचे गुणपत्रक.
- आय. टी. आय. विजतंत्री (Electrician) गुणपत्रक (चारही सत्र / वार्षीक).
- आधार कार्ड.
- मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र / आर्थिक दुर्बल घटक असल्यास त्याचेही प्रमाणपत्र.
- यापुर्वी शिकाऊ उमेदवारी केलेली नसावी.
- वरील सर्व कागदपत्रांची स्वसाक्षांकित प्रती.
- सदर भरतीकरीता महापारेषण कंपनीचे संबंधित सर्व परिपत्रके, अटी व शर्ती, नियम व अटी लागू राहतील व अधिक माहितीसाठी www.mahatransco.in या संकेतस्थळावर Carrier या सदराखाली जाहिरात पाहवी.
- उमेदवारांची निवड त्यांचे आय. टी. आय. चे चारही सत्राच्या गुणांच्या व एस. एस. सी. च्या गुणाच्या आधारे होईल व मौखीक चाचणी घेतली जाणार नाही किंवा इतर कोणतेही गुण ग्राहय धरण्यात येणार नाही.
- वरील प्रमाणे नमुद अंतिम दिनांका नंतर व ही जाहिरात प्रसिध्द होण्याच्या दिनांकापूर्वी सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
विशेष माहिती : Mahapareshan Bharti 2023
- शैक्षणिक अर्हता : 10वी उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन. सी. टी. व्ही. टी. नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन आय. टी. आय. दोन वर्ष वीजतंत्री (Electrician) परीक्षा उत्तार्ण असणे आवश्यक.
- भरती प्रक्रियापुढील प्रमाणे राबविण्यात येईल : जे उमेदवार www.apprenticeshipindia.gov.in संकेतस्थळावर अर्ज करतील व त्या अर्जाची Screen shot यासोबत जोडलेला फॉर्म भरूनसर्व आवश्यक कागदपत्रा सहीत वरील उत्तीर्ण गुण व एस. एस. सी. उत्तीर्ण गुणांच्या आधारे सहीत नमूद कार्यालयाच्या पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने आवश्यक दस्त ऐवजासह पाठवावे.
- आय. टी. आय. गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. कंपनीच्या विहीत तरतुदीनुसार आरक्षणानुसार निवड यादी तयार केली जाईल. एखाद्या प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास ते गुणवत्तेनुसार प्रवर्गाचा विचार न करता भरले जाईल. निवड केलेल्या उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडुन वैद्यकिय चाचणी करून घेणे बंधनकारक राहिल. कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय कोणताही उमेदवार शिकाऊ उमेदवारीस पात्र ठरणार नाही.
- वयोमर्यादा : दि. १९.१०.२०२३ रोजी किमान १८ वर्ष पुर्ण / कमाल ३८ वर्ष (मागासवर्गीय / आर्थिक दुर्बलघटक यांना ५ वर्ष शिथीलक्षम).
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवार यांनी घ्यावयाची काळजी बाबत :
- उमेदवाराने आपला प्रोफाईल तपासुन घेणेची जबाबदारी उमेदवारीची असेल. अर्ज सादर करताना एस. एस. सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व आय. टी. आय विजतंत्री उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नाव व आधारकार्डवर नमुद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा कसे याची पडताळणी करून माहिती भरावी. एस. एस. सी. गुणपत्रक / प्रमाणपत्र, आय. टी. आय. उत्तीर्ण सर्व सत्रांचे गुणपत्रक / प्रमाणपत्र (चारही सेमिस्टरची) स्वसांक्षाकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज केला असेल तर मागासवर्ग जात प्रमाणपत्र तसेच आर्थिक दुर्बल घटक (EWS) मधुन (EWS) प्रमाणपत्र www.apprenticeshipindia.gov.in वर अपलोड करणे तर अर्ज केला बंधनकारक आहे.तसेच सोबत जोडलेला विहित फॉर्म, screenshot, आवश्यक दस्ताऐवज अर्जा सोबत सादर करणे बंधनकारक आहे. शिकाऊ उमेदवारांची सही, प्रवर्ग, जन्मतारीख, एस. एस. सी मार्क, आय. टी. आय. मार्क, ही माहिती अचुक भरण्यात यावी. सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिका-याकडुन दबाव आपल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी रह करणेत येईल याची नोंद घ्यावी.
- शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर फोटो, मुळ | प्रमाणपत्राची सुस्पष्ट स्कॅन करून योग्य रितीने ऑनलाईन माहिती भरावी ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जाची रिकनशॉट सहीतसोबत जोडलेला फॉर्म सुवाच्य अक्षरात बिन चूक भरून विहीत कालमर्यादे मध्ये कार्यालयास प्राप्त होतील अशा बेताने प्रत्यक्ष अथवा पोस्टाने संपुर्ण दस्त ऐवजसह पाठवावे.
- प्रत्येक उमेदवाराची वर्तणुक चांगली व शिस्तप्रिय असणे आवश्यक आहे. या बाबत कोणतीही गैरवर्तणुक केल्यास शिकाऊ कायदा १९६१ मधील १७ अन्वये शिक्षेस ते पात्र ठरतील.
- प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर ३०० मार्कची (६ तास अवधीची) परिक्षा उमेदवाराने देणे अनिवार्य राहील. जो उमेदवार प्रशिक्षण कालावधी पुर्ण करेल तोच उमेदवार परीक्षेस बसण्यास पात्र असेल.
इतर आवश्यक माहिती : Mahapareshan Bharti 2023
- उमेदवारांनी आपली प्रत्येक माहिती अचुकपणे विहित फॉर्म मध्ये भरावी कारण त्यात नमुद माहिती आधारे निवडयादी बनविण्यात येणार असुन त्यात पुन्हा बदल करता येणार नाही. निवड यादीत नमुद उमेदवारांचीच फक्त कागदपत्रे निवड झाल्यानंतर पडताळण्यात येतील. पडताळणी अंती अपात्र ठरल्यास प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचा विचार केला जाईल. फॉर्म मधील चुकीच्या भरलेल्या माहितीमुळे निवड झाली नाही तर त्यास संपुर्णपणे उमेदवार जबाबदार राहील.
- सदर शिकाऊ भरती मध्ये अंशत: बदल किंवा संपुर्ण रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखुन ठेवत आहे. सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही. तसेच सदर बाबतीत कुठल्याही प्रकारची तक्रार विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- निवड यादी www.mahatransco.inया संकेत स्थळावर Carrier या सदराखाली उपलब्ध होईल.
- मदतीसाठी ईमेल आयडी : dymgrhr2120@mahatransco.in
Normal work job
Job available