
चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली द्वारे आकांक्षित तालुका फेलो ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 03 पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा 55,000 दिले जाणार आहे. तुम्ही उत्सुक असाल तर ऑनलाइन (ई- मेल) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिक माहिती |
आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत नेमलेल्या आकांक्षित तालुका फेलोंच्या कालावधी मा. निती आयोगाने वेळोवेळी दिलेल्या कालावधीकरीता राहील. तद्नंतर फैलोच्या कामाचा मुल्याकंन करुन आवश्यकतेनुसार मा. निती आयोगाने दिलेल्या कालावधीकरीता मुदतवाढ देण्यात येईल. सदर नेमणूक प्रक्रिये संदर्भात सर्व अधिकार मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचेकडे राखीव ठेवलेले आहे. मा. नीती आयोग यांच्या सुचनांनुसार सदर नेमणुक मानधन तत्वावर बाह्यस्रोत संस्थेकडून करण्यात येणार असून.नेमणुकीच्या कोणत्याही टप्यावर सदर नेमणुक रद्द करण्याचे अथवा त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना असतील.
निवड झालेल्या उमदेवाराला नेमणुकीच्या ठिकाणी कायमस्वरुपी हजर राहावे लागेल. सदर अटीया भंग केल्यास कोणत्याही पुर्व सुचना न देता एकतर्फी नेमणुक रद्द केल्या जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 सप्टेंबर 2025 आहे. तर अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: dpogadchiroli@gmail.com हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.