राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवक व इतर पदांची भरती! NHM Sindhudurg Bharti 2023

NHM Sindhudurg Bharti 2023 : 15 वा वित्त आयोगाचे अधिनिस्त खालीलप्रमाणे नमुद करणेत आलेली पदे 11 महिने 20 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पधतीने भरणेकरिता अर्ज खाली नमुद करणेत आलेल्या तारखेला मागविणेत येत आहेत. जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र असलेल्या सामाजिक प्रवर्गातील उमेहवारांनी अर्ज सादर करावयाचा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

खालील टेबल मध्ये पदाचे नाव,शैक्षणिक अहर्ता व इतर माहिती :

अ. क्र.पदाचे नाव शैक्षणिक अहर्ता एकूण पदे मासिक
मानधन
1वैद्यकीय अधिकारी MBBS
(Medical Council Registration)
560,000 रूपये
2आरोग्य सेवक 12 th Pass in Science+ Paramedical
Basic Training Cource Or
Sanitary Inspector Cource
918,000 रूपये
3कीटकशास्त्रज्ञM.Sc. Zooology With
5 years experience
740,000 रूपये
4सार्वजनिक आरोग्य तज्ञAny Medical Graduate with MPH/ MBA / MBA in Health735,000 रूपये

अटी व शर्ती खालीलप्रमाणे : NHM Sindhudurg Bharti 2023

  • आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे अगर 15 वा वित्त आयोग संदर्भात नियमित प्राप्त होणा-या भरतीबाबतचे मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करणेत येईल याची पात्र उमेवारांनी नोंद घ्यावी.
  • उपरोक्त पदे ही निव्वळ कंत्राटी असुन राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. शासकीय नियमित सेवेत सामावून घेणेबाबत किंवा शासनाकडे सेवा संरक्षणासाठी दावा करणेचे कोणतेही अधिकार नियुक्त उमेदवारास राहणार नाहीत.
  • विहित सामाजिक प्रवर्ग वगळून आलेल्या अर्जाची नोंद घेतली जाणार नाही फक्त जाहिरातीत नमुद केलेल्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाईल याची उमेदवारांनी नोंद घेणेची आहे. क्रमांक 1 व 2 ची पदे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी मंजुर आहेत. या पदाचा कामकाजाचा कालावधी दुपारी 2.00 ते रात्री 10.00 आहे याची उमेदवारांनी नोंद घेणेची आहे. पदभरतीची विस्तृत जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गचे संकेतस्थळाव www.sindhudurg.nic.in प्रसिद्ध करणेत येणार आहे. याबाबत अर्जदारास स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • उपरोक्त पदांसाठी फक्त दिलेल्या सामाजिक प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी दि. 9/10 /2023 ते दिनांक 17/10/ 2023 या कालावधीतील सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत संकेतस्थळावरील जाहिरातीत नमुद केलेल्या कागदपत्रासह व संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना सुचित केलेप्रमाणे भरावयाचा आहे. सदर अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, पिन कोड 416812 यांचे कार्यालयाकडे सादर करणेचा आहे. अर्जावर मा. निवड समिती अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM, SINDHUDURG) व पदाचे नावाचा स्पष्ट उल्लेख करुन अर्ज सादर करावेत. अर्जाचे लखोटयावर 15 वा वित्त आयोग पदभरती, सिंधुदुर्ग व पदाचे नावाचा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारानी नोंद घ्यावी.
  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.150/- इतके शुल्क आकारणेत येत आहे. अर्जाचे शुल्क हे डिडि स्वरुपात किंवा ऑनलाईन पद्धतीने (फोन पे / जीपे/ युपीआय/ इंटरनेट बँकिंग / मोबाईल बँकिंग ) स्विकारणेत येणार आहे. संबंधित शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया SINDHUDURG DISTRICT INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY NON PIP खाते क्रमांक 40627414821 आयएफसी कोड SBIN0004511 या खाते क्रमांकावर भरणा करावे. संबंधित शुल्क भरणा केलेनंतर त्याचा UTI / UTR Transaction No. अर्जामध्ये स्पष्ट नमुद करावा. अर्जासोबत ऑनलाईन भरणा केलेल्या रकमेची पावती जोडणे बंधनकारक आहे. सदर शुल्क नापरतावा (Not Refundable) आहे.
  • निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेनंतर हजर होणेपुर्वी राज्य आरोग्य सोसायटीकडून प्राप्त झालेल्या अटी व शर्थी रु. 100/- चे बॉन्डपेपरवर लिहून करारनामा सादर करणे बंधनकारक आहे.
नमूना अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

या भरती बद्दल आवश्यक माहिती :

  • वयोमर्यादा- वैदयकिय अधिकारी एमबीबीएस या पदांची भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 61 वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा 70 वर्षे राहिल. उर्वरीत सर्व पदांचे भरतीसाठी अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गातील उमेवारांसाठी 43 वर्षे राहिल. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदवारांकरिता कमाल सेवा प्रवेश मर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे. 60 वर्षावरील अर्जादारांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारिरिक योग्यतेचे प्रमाणपत्रक ( मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहिल.
  • उमेवारांसाठी सुचना- पदांचे संबंधित कामकाजाचा अनुभव असेल तरच ग्राहय धरणेत येईल. आठवडयातील एखादा दुसरा दिवस कामकाज केलेले असेल तर किंवा सहा महिने यापेक्षा कमी कालावधीचा अनुभव ग्राहय धरणेत येणार नाही. सामाजिक प्रवर्गातील उमेदवारानी अर्ज सादर करावयाचे आहेत. सामाजिक प्रवर्ग वगळता आलेले अर्ज अपात्र ठरवणेत येतील. अर्ज स्वच्छ अक्षरात व विहित करणेत आलेल्या प्रमाणपत्रांसोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची विहित शैक्षणिक अर्हतेच्या अंतिम वर्षाच्या टक्केवारीच्या 50 टक्के (50 गुण), संबंधित पदाचे अनुशंगाने असणारा नियमित कामकाजाचा शासकीय व निमशासकीय अनुभव (एका वर्षासाठी 6 गुण ( याप्रमाणे एकूण 30 गुण) आहेत. (अनुभवाचे प्रमाणपत्र जोडले असल्यास संबंधित संस्थेने दिलेले नियुक्ती आदेश, हजर अहवाल हे अनुभव प्रमाणपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे अन्यय: अनुभव ग्राहय धरणेत येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. खाजगी संस्थेत कामकाज केलेले असेल तर उमेदवाराना त्या कालावधीचे गुणांकन करणेत येणार नाही मात्र सुचित केलेनुसार विहित कालावधीचा अनुभव असेल तर पदासाठी पात्र करणेत येईल. निवड समितीने मागणी केलेवर उमेदवाराने हजेरीपटातील नोंदी किंवा वेतन जमा होत असलेबाबत बँक स्टेटमेंट उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. संबंधित क्षेत्रातील उच्च शैक्षणिक अर्हतेच्या अंतिम वर्षाच्या टक्केवारीच्या 20 टक्के (20 गुण) असे एकूण 100 गुण या तीन बाबींचे आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करणेत येणार आहे. या यादीवर उमेदवारांची हरकत असेल तर पुराव्यानिशी हरकती मागवून घेणेत येतील. हरकती प्राप्त झालेनंतर त्याची विहित नोंद घेऊन अंतिम निवड / प्रतिक्षा यादी 1:5 या प्रमाणात किंवा उमेदवारांच्या उपलब्धतेनुसार तयार करणेत येऊन विहित संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येईल. यासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सिंधुदुर्ग संकेतस्थळाचे अवलोकन करावे. वेळोवेळी प्रसिद्ध करणेत येणा-या मार्गदर्शक सुचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येतील.
  • दिनांक 23/07/2020 पासून दोनपेक्षा अधिक हयात मुले असणारे उमेवार भरतीसाठी अर्ज करणेस पात्र राहणार नाहीत.
  • विहित सांक्षांकित प्रमाणपत्राबाबत पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या उत्तीर्ण वर्षाची मार्कलिस्टव प्रमाणपत्रकांच्या साक्षांकित प्रती उच्च शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या उत्तीर्ण वर्षाची मार्कलिस्ट व प्रमाणपत्रकांच्या साक्षांकित प्रती वयाचे सबळ पुराव्यासाठी शाळा सोडलेचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र, कामाचे अनुभव प्रमाणपत्र व संबंधित आवश्यक माहिती सुचीत केलेनुसार कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र हे पदांचे आवश्यकतेप्रमाणे सादर करणेचे आहे.
  • उपरोक्त पदे ही निव्वळ कंत्राटी असुन राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. शासकीय नियमित सेवेत सामावून घेणेबाबत किंवा शासनाकडे सेवा संरक्षणासाठी दावा करणेचे कोणतेही अधिकार नियुक्त उमेदवारास राहणार नाहीत.
  • 15 वा वित्त आयोग योजनेतील पदांचे आवश्यकतेनुसार नियुक्ती देय राहिल.
  • अर्ज स्वच्छ अक्षरात व खाडाखोड न करता विहित व आवश्यक प्रमाणपत्रांसहीत भरणे आवश्यक राहिल.

इतर पात्रता : NHM Sindhudurg Bharti 2023

  • अर्जदार हा शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  • उपरोक्त नमुद करणेत आलेल्या पदांबाबत विस्तृतपणे निवडीच्या अटी व शर्ती तसेच इतर आवश्यक ती सर्व विहित माहिती जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गचे संकेतस्थळावर www.sindhudurg.nic.in यावर पाहण्यास उपलब्ध राहिल.
  • उमेवारावर पुर्वीच्या शासकीय कर्मचारी कार्यकाळात कुठल्याही प्रकारची प्रशासकीय / वित्तिय कार्यवाही, दंडात्मक कार्यवाही किंवा फौजदारी अथवा इतर कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हयाची नोंद नसावी किंवा झालेली नसावी.
  • उपरोक्त पदांचे संख्येमध्ये अगर पदांचे आरक्षणामध्ये कमी अगर जास्त बदल होऊ शकतो.
  • या पदांचे नेमणुकीबाबत 15 वा वित्त आयोगाचे मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही प्रस्तावित करणेत येईल.
  • विहित सामाजिक प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर खुल्या प्रवर्गाची प्रतिक्षा यादी करुन योजनेसाठी आवश्यकता असेल तर मर्यादित कालावधीसाठी तात्पुरती नियुक्ती, तसेच अकरा महिने एकोणतीस दिवसां कालावधीत एखादया संवर्गातील पद रिक्त झालेले असेल आणि त्या संवर्गाचे सामाजिक प्रवर्गातील प्रतिक्षा यादीवर उमेदवार उपलब्ध असतील तर योजनेच्या आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती देण्याबाबतचे सर्व अधिकार अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी (कार्यकारी समिती) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचेजवळ राखुन ठेवणेत आलेले आहेत.
  • रिक्त पदांचे संख्येत तसेच भरती प्रकियेतील सर्व अधिकार अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी (कार्यकारी समिती) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचेजवळ राखुन ठेवणेत आलेले आहेत.

Leave a Comment